काय सांगता ! आधी रेल्वे प्रवास करा आणि नंतर द्या तिकिटाचे पैसे
आता तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. पेटीएम तुम्हाला ही सुविधा देत आहे. पेटीएम पेमेंट गेटवे वापरकर्ते आता प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड वापरुन IRCTC तिकीट सेवेवर ‘आता बुक करा, नंतर पैसे द्या’ याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, पेटीएम पोस्टपेड वापरकर्ते नंतर रक्कम भरण्याचा पर्याय निवडून त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करू शकतील. ही सुविधा शेकडो लोकांसाठी वरदान ठरू शकते कारण पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतील.
कंपनीने म्हटले आहे की पेटीएम वापरकर्त्यांनी आता तिकिट खरेदी करा, नंतर पैसे द्या या सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवातदेखील केली आहे. कारण तिकीट बुक करणे, बिले भरणे किंवा खरेदी करण्यासाठी असा पर्याय मिळणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे त्यांना शक्य होत आहे.
वापरकर्ते किरकोळ दुकाने आणि वेबसाइट्सवर उत्पादन आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. पेटीएम पोस्टपेड ३० दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी ६० हजारांपर्यंतचे व्याजमुक्त क्रेडिटची ऑफर देत आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या सर्व क्रेडिट-आधारित खर्चाचा मागोवा ठेवण्यासाठी मासिक बिल दिले जाते. वापरकर्ते बिलिंग सायकलच्या शेवटी संपूर्ण रक्कम देऊ शकतात किंवा सोयीस्कर पेमेंटसाठी त्यांचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात.
0 Comments