बागलवाडी गावच्या शिरपेचात प्रथमच बुलंद असा एक मानाचा तुरा रोवणारे ,
श्री . संतोष हणमंत चव्हाण यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐
बागलवाडी गावचे सुपुत्र नुतन PSI
श्री.संतोष हणमंत चव्हाण यांचा सत्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते .
यावेळी नूतन PSI संतोष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास यश हे 100% मिळतच आणि मी यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे मला हे हे यश मिळाले .
या कार्यक्रमास सांगोला पंचायत समितीचे सभापती मा.सौ.राणीताई कोळवले मॅडम उपसभापती श्री .नारायण जगताप साहेब पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब काटकर व सरपंच सौ .संपता महादेव साठे, सोनलवाडीचे सरपंच, अचकदाणीचे सरपंच , मेथवडेचे सरपंच, धोंडेवाडीचे सरपंच , पोलीस पाटील राजकुमार आळसुंदकर, चेअरमन सदाशिव चव्हाण व इतर ग्रामस्थ मित्रपरिवार उपस्थित होते

0 Comments