google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

Breaking News

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

 ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे


सांगोला/प्रतिनिधी :30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे माजिवडा प्रभाग या सायंकाळी 5.30 च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातगाडी, फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे.

 

या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पुर्णपणे तोडून रस्त्यावर पडली. व उजव्या हाताला अंगठ्या सह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे. अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पूर्णपणे तुटून पडले या दोघांनाही प्रथमता वेदांत रूग्णालय ठाणे येथे नेण्यात आले. गंभीर दुखापत व जिवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तात्काळ ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे दाखल करण्यात आले. श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या वर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची तुटलेली दोन्ही बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अंगरक्षक सोमनाथ पालवे यांचे तुटलेली बोट रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत शोध घेऊन ही सापडले नसल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा पुरोगामी महाराष्ट्राला सदरच्या घटनेमुळे शरमेने मान खाली घालावी लागली अशी ही घटना निंदनीय आहे.


एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून, या बाबीचा सर्व स्तरावर निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठ चे बदल्यांचे चक्राकार धोरण पती-पत्नी एकत्रीकरनाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा सुध्दा गांभीर्याने विचार होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सांगोला नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकार्‍यांवर हल्ले करतात तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय आहे. सदर प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी सांगोला नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदन देतेवेळी आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा सरचिटणीस नगरसेवक सुरज दादा बनसोडे, नगरसेवक अस्मीर तांबोळी, मा. नगरसेवक नूतन व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सोमनाथ गुळमिरे, प्रसिद्ध व्यापारी मा. नगरसेवक माऊली तेली, मायाका प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग (बाबू) गावडे, नंदकुमार खांडेकर, व्यापारी अमित धतींगे, मा. नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सुरेश आप्पा माळी उपस्थित होते.



व्यापारी असोशियन सांगोला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक सोमनाथ गुळमिरे यांचा सत्कार आर पी आय नगरसेवक सुरज दादा बनसोडे, नगरसेवक अस्मिर तांबोळी, माजी नगरसेवक माऊली तेली , भावी नगरसेवक चंचल बनसोडे, सोपान आण्णा बनसोडे, सोमा ठोकळे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments